Top News

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कढोली येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम.


कढोली
: न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, कढोली येथे इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचाल, विविध करिअरच्या संधी तसेच योग्य क्षेत्राची निवड करण्याबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक श्री. योगेश माळी, समाजकार्य विभाग हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दहावीनंतर उपलब्ध असणारे विविध शैक्षणिक पर्याय, विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी, आवड व क्षमता ओळखून करिअरची निवड करण्याचे महत्त्व तसेच भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक सूर्यवंशी सर होते. तसेच मंचावर एल. पी. पाटील सर, कोळी मॅडम व मोहकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत दिशा मिळण्यास मदत झाली. श्री तेजस पाटील, दिप्ती चिकाटे, स्वाती पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज