Top News

ढाई आखर पत्रलेखन स्पर्धेला शेठ ला. ना. सा. विद्यालयाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१४० विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून दिला निसर्ग संवर्धनाचा प्रभावी संदेश

जळगाव प्रतिनिधी : भारतीय डाक विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेला जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इयत्ता ६ वी ते १० वीतील तब्बल १४० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

‘माता पृथ्वीचे संरक्षण’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आंतरदेशीय पत्रावर ५०० शब्दांत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत आपले विचार मांडले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर, पाण्याची नासाडी, जलप्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि ध्वनी प्रदूषण यांसारख्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी संवेदनशीलपणे भाष्य केले.

यावर उपाय म्हणून वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरणपूरक जीवनशैली तसेच सण-उत्सवांमध्ये पारंपरिक कर्णमधुर वाद्यांचा वापर करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रांतून दिला. पृथ्वी मातेने आपल्याला सुंदर निसर्ग दिला असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा प्रभावी संदेश या पत्रलेखनातून व्यक्त झाला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे आणि पर्यवेक्षक जगदीश साळुंखे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून दिलेले ‘पृथ्वीमाता संरक्षणाचे’ वचन प्रत्यक्ष कृतीतून पाळण्याचे आवाहन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपदा तुंबळे, योगिता तडवी, रुपाली महाजन, मधुश्री मदाने, मनिषा पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज