Top News

चोपड्यात तालुकास्तरीय ‘सुंदर हस्ताक्षर’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७३ विद्यार्थ्यांचा सहभाग

 


चोपडा : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय संध्याताई मयूर (माजी सचिव, चोपडा एज्युकेशन सोसायटी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ सप्टेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय ‘सुंदर हस्ताक्षर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल १७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

स्वर्गीय संध्याताई मयूर यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या अध्यापक विद्यालयामार्फत दरवर्षी विविध नावीन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सत्यम’ गट, इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिवम’ गट तसेच इयत्ता ११ वी, १२ वी व डी.एल.एड. विद्यार्थ्यांसाठी ‘सुंदरम’ गट अशा तीन गटांत ही स्पर्धा एकाच सत्रात घेण्यात आली.

या स्पर्धेत पंकज माध्यमिक विद्यालय, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, विवेकानंद माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजेंद्र माध्यमिक विद्यालय गोरगावले, प्रताप विद्या मंदिर, सी.बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव, शा. शि. पाटील माध्यमिक विद्यालय चहार्डी, प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा, माध्यमिक विद्यालय नागलवाडी, बालमोहन माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, शिक्षणशास्त्र विद्यालय चोपडा आणि अध्यापक विद्यालय चोपडा आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेश लिहून केले. यावेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी संस्थेचे समन्वयक आ. श्री. गोविंदभाई गुजराथी तसेच आ. श्री. डी. टी. महाजन सर उपस्थित होते.

स्पर्धेचे नियोजन अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. योगिता बोरसे, प्रा. एम. एन. मराठे, प्रा. एस. एस. धनगर, प्रा. एम. एम. पाटील, प्रा. रश्मी शेख, प्रा. पूजा माळी, श्री. एम. एल. पटेल यांनी सहकार्य केले. स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा. एस. एस. देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली.

द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी स्पर्धेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. आर. व्ही. सोनवणे तसेच ज्येष्ठ प्राध्यापक एम. पी. पाटील, प्रा. एन. डी. वाल्हे आणि प्रा. डॉ. सविता जाधव यांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

तसेच आ. श्री. शरद पाटील, श्री. आशिष शहा, श्री. दीपक विसावे, श्री. शुभम गुजराथी आणि सेवक बंधू संजय पाटील, चंपालाल बारेला, राहुल पाटील, भूषण कोळी, वलियोद्दीन शेख यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज