Top News

जय लहुजी दहिहंडी महोत्सवाचे ५ सप्टेंबरला आयोजन


अखिल भारतीय मातंग सेनेतर्फे विविध मान्यवरांची उपस्थिती; गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

मुंबई, प्रतिनिधी : अखिल भारतीय मातंग सेनेतर्फे ‘जय लहुजी दहिहंडी महोत्सव’चे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. योगेश चगनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचे आयोजन लोकशाहीर क्रांतिसम्राट डॉ. बाबासाहेब गोपीनाथ गवई प्रवेशद्वार, शिल्पशामला महिला सेव चाळ, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नगर समोर, कार्तार हॉल, वीरमाता जिजाई भोसले मार्ग, मानखुर्द, मुंबई-४३ येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमात डॉ. श्री. विनोद बाबर सर, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॉनी रावत, अभिनेत्री स्वाती माने तसेच प्रबंधकार सुनील साठे यांची विशेष आकर्षणे असणार आहेत. तसेच कवी, लेखक व अभिनेता सुरज पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या १,००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महोत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज