Top News

लोकमातेच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व गणवेश वितरण !...

 

लोकमातेच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व गणवेश वितरण !

संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा यांच्याकडून ३१०० रु.चा धनादेश !

माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्याकडून ५ गणवेश !

धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे जगातील आदर्श महामाता राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.



           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. याप्रसंगी दर वर्षाप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शहरातील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा चे अध्यक्ष व्ही टी माळी, सचिव आर डी महाजन, सल्लागार पंच एच डी माळी, पी डी पाटील यांच्या उपस्थितीत शाळेच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या गणेशासाठी 3100 रु चा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या हातात सुपूर्त करण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे यांचे चिरंजीव जळगाव येथील अभियंता व शाळेचा माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्याकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५ गणवेश वितरण करण्यात आले.

            एस व्ही आढावे व पी डी पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांचे जीवन चरित्र उलगडून त्यांचे संघर्षमय कार्य विद्यार्थ्यांसमोर विशद केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना , पानवठे, विहिरी , मंदिरे , घाट , युद्धनीती, युद्ध कौशल्य लोककल्याणकारी राणी म्हणजेच अहिल्यामाई होळकरहोय असे प्रतिपादन आढावे व पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी होळकर घराण्याचा वारसा व अहिल्यामाईंचा चोंडीची कन्या ते लोकमातेपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. धरणगाव येथील माळी समाजातर्फे धनादेश दिला व माजी विद्यार्थी कापडणे यांनी गणवेश दिले या सर्वांचे मुख्याध्यापकांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज