धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शाळेमध्ये चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि भारताचा तिरंगा, भारतीय सैनिक असे विविध देशभक्तीपर चित्र रेखाटण्याचा आनंद घेतला.चित्रकला स्पर्धेसाठी कलाशिक्षक एच डी माळी, पी डी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 
विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : जे एस पवार ( मुख्याध्यापक )
रांगोळी स्पर्धेत देखील मुलींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. रांगोळी स्पर्धेसाठी जेष्ठ शिक्षिका एम के कापडणे व श्रीमती व्ही पी वऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. निबंध स्पर्धेत देखील शाळेतील सर्वच मुलांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी एस एन कोळी व एस व्ही आढावे यांचे मार्गदर्शन लागले. वरील चित्रकला निबंध व रांगोळी स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण केले जाईल.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे सेवानिवृत्त जेष्ठ लिपिक आर बी पाटील भाऊसाहेब यांच्याकडून शाळेतील दोन गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व शिक्षक बंधू-भगिनी यांनी सेल्फी विथ तिरंगा विद्यार्थ्यांसोबत फोटो घेतले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment