Top News

फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांना राज्यमंत्रीपद देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. अनुराधा अतुल चव्हाण यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक, साहित्यिक, लेखक, अभिनेते तसेच सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आमदार अनुराधा चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात तसेच सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क, लोकहिताची कार्यपद्धती आणि विकासकामांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्या मतदारसंघात लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग व्हावा, यासाठी त्यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागणीचा सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे सुरज पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज