Top News

‘चमत्कारामागील विज्ञान’ सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन


 

जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा विज्ञान अभ्यासक श्री. मिथुन धिवरे यांच्या ‘चमत्कारामागील विज्ञान’ या विषयावरील सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात झाला.

यावेळी धिवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध वैज्ञानिक प्रयोग व बौद्धिक खेळ सादर केले. पाण्याचा दिवा पेटविणे, कागदावर ‘भूत अक्षर’ उमटविणे, एक रुपयाचे नाणे अदृश्य करणे, डोळे बंद करून वस्तू ओळखणे, उष्णतेचे वहन व जडत्व आदी प्रयोगांच्या माध्यमातून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा स्पष्ट केली.

अंधश्रद्धेला बळी न पडता प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान समजून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. उपक्रमात अचूक बौद्धिक क्रिया करणाऱ्या विद्यार्थ्यांना धिवरे यांनी स्वलिखित पुस्तके व पेन देऊन प्रोत्साहन दिले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी, तर आभार प्रणित येवले यांनी मानले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षक रमा तारे, जगदीश साळुंखे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज