Top News

सायबर जनजागृतीसाठी जळगाव जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

जळगाव : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ऑक्टोबर २०२६ हा सायबर जनजागृती महिना म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी OTP, PIN, CVV व पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘खाते ब्लॉक’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व मुलांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सतर्क राहा, सुरक्षित राहा!

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज