Top News

‘कॉकरोच जनता पार्टी’ नव्हे ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ !

गोव्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनात ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा; ‘सीजेपी’चा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा उघड !

आंदोलकांवर कठोर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समितीची मागणी

 ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या वतीने पणजी येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले. वरकरणी हे आंदोलन ‘एस्‌.आय.आर्‌.’चा विरोध आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या मागण्यांसाठी केले असले, तरी प्रत्यक्षात तिथे उघडपणे ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. यातून ‘सीजेपी’चा आंदोलनामागील ‘हिंदुविरोधी अजेंडा’ पुन्हा एकदा समोर आला. आंदोलनाचा हेतू हिंदूंना लक्ष्य करणे आणि शांत गोव्यातील सामाजिक सलोखा बिघडवणे हाच होता, त्यामुळे ‘सीजेपी’ आंदोलनाच्या सूत्रधार अमरिन शेख यांच्यासह सर्व आंदोलकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली आहे.

 श्री. नाईक यांनी पुढे म्हणाले की, या संघटनेच्या आंदोलनांचा पूर्वेतिहास पाहता त्यांच्या व्यासपीठावरून सातत्याने हिंदूविरोधी आणि देशविरोधी भूमिका मांडली जात आहे. पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची कवितेवर आधारित ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे... बस नाम रहेगा अल्लाह का…’ हे गीत स्वरूपात सादर केले गेले. एकीकडे प्रभू श्रीराम-हिंदुवाद यांचा द्वेष आणि दुसरीकडे पाकिस्तानी कवी-‘नाम रहेगा अल्लाह का’ हा इस्लामिक प्रचार यातून ‘सीजेपी’चा बुरखा फाटला आहे. गोव्यातच यापूर्वी ‘नीट परीक्षां’च्या विरोधात आमरिन शेख यांच्याच नेतृत्वात झालेल्या आंदोलनात ‘फ्री उमर खालिद’चे पोस्टर्स झळकावले गेले.

 यांसारखे अनेक ठिकाणी ‘सीजेपी’च्या आंदोलनात हिंदुविरोध आणि देशद्रोह्यांचे समर्थन करण्यात आले आहे. तरी अशा आंदोलनांमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जात आहे. सामाजिक विषयांचे निमित्त करून देशातील युवकांना हाताशी धरून अराजकता माजवण्याचे काम ‘सीजेपी’ करत आहे. ‘सीजेपी’ ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ नसून ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. तरी या संघटनेला देशद्रोही आणि हिंदुद्रोही घोषित करून त्यांच्यावर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज