पाळधी : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पावन पर्वानिमित्त पाळधी येथील आठवडे बाजार चौक (भगवा चौक) येथे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शस्त्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण इतिहासातून प्रेरणा घेत, संस्कृती व परंपरेचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शस्त्र पूजनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि नव्या पिढीमध्ये शौर्य, स्वाभिमान व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ ॲड. सर्वेश मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पाळधी व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment