Top News

ब्रह्मपुरीत अवैध दारू तस्करीवर एलसीबीचा छापा; दोघे अटकेत, एक फरार

(कारमधून ४ हजार देशी दारूच्या बाटल्या जप्त; ५.६० लाखांचा मुद्देमाल ताब्यात )

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी श्री संजय बागडे :- अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुंन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा कुडेसावली शिवारात कारमधून होणारी देशी दारूची वाहतूक पकडली. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार देशी दारूच्या बाटल्या, फोर्ड फिगो कारसह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

८ सप्टेंबर रोजी गांगलवाडी-पाथरी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत कारमधून अवैध दारूची मोठी खेप पाथरीच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कुडेसावली शिवारात नाकेबंदी करून सापळा रचला.

यावेळी संशयास्पदरीत्या येणारी फोर्ड फिगो (एमएच ३१ बीके ९२४२) कार अडवून झडती घेतली असता ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्यांनी भरलेल्या ४० पेट्या, म्हणजेच एकूण ४ हजार बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १ लाख ६० हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या कारची किंमत ४ लाख रुपये आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सुनील रमेश नरुले आणि विपुल तानाबा मेश्राम, दोघेही रा. हळदा, ता. ब्रह्मपुरी, यांना घटनास्थळावरून अटक केली. तर त्यांचा साथीदार हरभजनसिंग सतनामसिंग हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७०१/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

चंद्रपूर-गडचिरोली सीमावर्ती भागातून छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आण ि पुरवठा साखळीपर्यंत तपास पोहोचणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.हाी  कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष निंबोरकर, हेड कॉन्स्टेबल जयंत चुनारकर, संतोष येलपुलवार, सुनील आत्राम, अजित शेंडे ,गजानन मडावी यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज