![]() |
| लोक शाहीर धम्मा खडसे आणि विजय शेंडे यांचा महा जलसा कार्यक्रमाने मोर्चा ठरला आकर्षक. |
प्रतिनिधी - श्री संजय बागडे ब्रह्मपुरी : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कामगार, जबरानजोत धारक, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील निराधारांच्या विविध मागण्यांसाठी आज मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी ब्रह्मपुरीमध्ये जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या महामोर्चाची सुरुवात हुतात्मा स्मारक, वडसा रोड, ब्रह्मपुरी येथून सकाळी 12 वाजता सुरू होऊन, मोर्चा ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयावर धडकला. ‘दे धडक बैलगाडी, ट्रॅक्टर’ किसान सभा जिंदाबाद, शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालाच पाहिजे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या,अशा घोषवाक्यासह अमरावतीचे क्रांतिकारी लोक शाहीर कॉ.धम्मा खडसे व गडचिरोलीचे लोक शाहीर विजयभाऊ शेंडे यांच्या महा जलसा कार्यक्रमातून हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी केले.या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे, कर्जमाफी करणे, संन २०२५-२६ ची शेतकऱ्यांची हेक्टरी १० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम तात्काळ देणे, नियमित वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना प्रस्तावित २ हजार रुपयांचे अनुदान तातडीने देणे आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ देणे ,तसेच जबरनजोत धारकांना जमिनीचे पट्टे व घराचे पट्टे देणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करणे, सर्व नोंदणी गट महिला व बँकिंगसाठी तसेच महिलांना कर्जमाफीचा लाभ देणे, गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे पाणी ब्रह्मपुरी विभागातील सर्व शेतकऱ्यांना देणे आणि स्मार्ट मीटर लावणे बंद करून लावलेले स्मार्ट मीटर काढून घेणे याशिवाय शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरची १.२५ लाख रुपयांची सबसिडी देणे, शेतकऱ्यांचा लागणारा डिझेल टँकर फी करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत देणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर कमी करणे तसेच संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तात्काळ देणे आदी मागण्या करण्यात आल्या . सदर मोर्चा बैल बंडी ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी शेतमजूर,महिला उपस्थितीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.यावेळेस उपस्थित मोर्चाला शेतकरी नेते कॉ.विनोद झोडगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ.जगदीश मेश्राम ,रिपब्लिकन पक्ष खोरीपा चे युवा नेते प्रशांत डांगे, जीवन बागडे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत नायब तहसीलदार बोबाटे यांच्या वतीने मुख्यमंत्री,कृषी मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात तालुक्यातील हळदा,आवळगाव ,मुडझा, बोडधा , कुडेसावली, बल्लारपूर, पद्मापूर, भूज, वांद्रा, बरडकिन्ही, आकसापूर, पवनपार, बेलगाव, सायगाव, डोरली, चिचगाव,मुरपार कोसंबी, गांगलवाडी, गोगाव, तळोधि,मेंडकी,बोरगाव, खेड आदी गावातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मोर्चाच्या यशस्वितेसाठी सुनील शेंडे, मधुकर चौधरी, सुनील म्हशाखेत्री, राजेश्वर मगरे, प्रतीक डांगे, मनोहर भरे,अमोल मानापुरे, शरद ठाकरे, उसन ठाकरे, शामराव राऊत, शालीक दडमल, गोलू दरवे, तुकाराम राऊत, मुखरु झोडगे, सुधीर खेवले, तुकाराम महाडोरे,विलास भोयर, चुनीलाल मोटघरे, पवन मगरे, महेंद्र सोडवले, दत्तू नागोसे यांनी सहकार्य केले.

Post a Comment