Top News

सुप्रसिद्ध लेखक सुरज सुधाकरराव पवार यांना इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न पुरस्कार जाहीर

यवतमाळ प्रतिनिधी सुरज पवार : सुप्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार, अभिनेते व समाजसेवक तथा सनातन सारथी न्यूजचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांना त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या सुप्रसिद्ध लेखक व कवी, पत्रकार स्वर्गीय सुधाकरराव परशुराम पवार यांच्या लिखित ‘वसंत गीतांजली’ या काव्यसंग्रहाचे लेखक-संपादक म्हणून सुरज पवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा काव्यसंग्रह हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती आणि त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पवार यांनी केलेले साहित्यिक कार्य उल्लेखनीय असल्याचे पुरस्कार आयोजकांनी नमूद केले आहे. तसेच साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.

सुरज सुधाकरराव पवार हे वसंत विहार प्रतिष्ठान, सेलूसे, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील साहित्यिक असून, स्वर्गीय सुधाकरराव पवार साहित्य संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न पुरस्काराचे वितरण ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे मान्यवर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार सोहळ्याचे आयोजक डॉ. सुरेश राठोड, दिल्ली यांनी दिली आहे.

या पुरस्काराची घोषणा झाल्याबद्दल साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून सुरज सुधाकरराव पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज