Top News

धरणगाव तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करा.

शिवसेना उध्दव ठाकरे गटाची मागणी.

धरणगाव: शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी व शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि ०४ रोजी धरणगाव तहसील कार्यालयात तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. धरणगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.गेल्या महिन्यापासून तालुक्यात पर्जन्यमान नसल्याने सर्व शेतपिके करपायला लागलेली असून शेतकरी हवालदिल तसेच उदीग्न झालेला असून परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे.गुरढोरांचे पाण्याअभावी हाल होत आहे.त्यांच्यासाठी तात्काळ चारा छावण्या उभारण्यात याव्यात.गिरणेचे एक आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे तसेच रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाच आवर्तन जाहीर करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.शासनाच्या निकषानुसार २१ दिवसाचा खंड पडला तर तात्काळ उपाययोजना करण्यात येतात परंतु तालुक्यात परिस्थिती अगदी विपरीत दिसत आहे.येत्या दहा दिवसांत कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी जि.प.मा.उपाध्यक्ष जानकीराम पाटील,मा सभापती दिपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, सुनिल चौधरी,किरण अग्निहोत्री, जितेंद्र धनगर,शेतकरी तालुका प्रमुख विजय पाटील, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील परदेशी, लिलाधर पाटील,नंदू पाटील,अरुण पाटील, गजानन महाजन,सुनिल चव्हाण, प्रविण पाटील,अक्षय मुथा,रियाझ बागवान, वसिम पिंजारी,प्रेमराज चौधरी,मेघनाथ ठाकरे,राकेश चौधरी, अरविंद चौधरी,शरद शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज