तालुका काँग्रेस कमिटीची मागणी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपविभागीय अधिकारी यांना निवेदन)
ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- संजय बागडे
ब्रम्हपुरी तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण, पावसाचे असमान वितरण तसेच पावसातील खंड यामुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागामध्ये पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नुकतीच शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीमध्ये ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. बम्हपुरी तालुक्यातील सद्यस्थितीचा विचार करता हा निर्णय शेतकरी व नागरिकांसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा. यासाठी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केलेला आहे.
दुष्काळग्रस्त तालुका म्हणून समावेश झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदत व सवलतींचा लाभ मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा. नुकसानयस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्ज व इतर शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून द्यावा. ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा .यासाठी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषदचे नगराध्यक्ष योगेश मिसार, शहर अध्यक्ष हीतेंद्र राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा सदस्य प्रमोद चिमूरकर, प्रा. राजेश कांबळे, वासुदेव सौंदरकर, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, बंटीभाऊ श्रीवास्तव,नेताजी मेश्राम ,वामन मिसार, नगरसेवक राकेश पडोळे, विनोद बुल्ले, कपिल राऊत, सौ. मंगला लोनबले, भावना इरपाते , नगरसेविका सौ.रंजना बुराडे, सौ. बबीता आमले,सौ .लताताई ठाकूर, सौ सुनीताताई तिडके ,सौ. रश्मी पगाडे, सौ .जया कन्नाके, सौ सुशीला सोंडवले अरुण अलोने ,जगदीश आमले सौ. कल्पना तुपट, राममोहन ब्राडिया, इरफान पठाण सौ. गीता मुंगले ,किशोर राऊत ,रुपेश बानबले, मोहसिन कुरेशी, केशव करंबे ,मुकुंदा राऊत ,संजय राऊत, ज्ञानेश्वर झरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment