Top News

चारभट्टी येथे हनुमान चालीसा पठणाचा भव्य भक्तीमय कार्यक्रम उत्साहात

 


भंडारा प्रतिनिधी:-

पवित्र श्रावण महिन्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान देवस्थान, चारभट्टी (ता. लाखांदूर) येथे साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने हनुमान चालीसा पठणाचा भव्य भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आलेल्या भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत केले व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सांगत समाजात धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि नैतिक मूल्यांची जपणूक होते, असे त्यांनी नमूद केले. तरुण पिढीनेही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजकार्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.



या कर्यक्रमांस खासदार डॉ. प्रशांत पडोळे, मोहन पंचभाई, मधुकरजी लिचडे, सदाशिवजी वलथरे, सुरेशजी ब्राम्हणकर, शीतलताई राऊत,सरपंच शैलेश रामटेके,धनराज तिरपूडे, मनीषाताई निंबाते, विद्याताई कुंभरे, वंदनाताई काळे, रसिकताई रंगारी, गंगाधरजी जीपकाटे, योगेश सलके, घनश्याम धामट, नारायण वरठे, मदनजी रामटेके, रमेश मेहंदळे, बबलू नागमोती, विनोद बळी, अजय तुमसरे आदी मान्यवारांसह युवक, महिला, भक्तगन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज