Top News

विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका; बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

धरणगाव : येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण तसेच एक दिवसाचे मुख्याध्यापक म्हणून भूमिका बजावणारे विद्यार्थी वेदांत शिंदे, परमेश्वर महाजन व कृष्णा चौधरी यांच्यासह उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका उत्स्फूर्तपणे व कौतुकास्पद पद्धतीने पार पाडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, शिस्त आणि शैक्षणिक कार्यपद्धतीचा अनुभव घेता आला.

कार्यक्रमात व्ही. बी. पाटील, महेश आहेराव व एन. बी. ठाकरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याबरोबरच शिक्षकांची समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी पाटील यांनी केले, तर तेजस्विनी मराठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख सागर पाटील, सदस्य ए. एच. पाटील, के. के. चव्हाण, पी. एस. गजरे, जे. एस. बोरसे, व्ही. एल. मोरे, एस. एस. देसले व पी. पी. रोकडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज