![]() |
| बालकवी ठोंबरे सारजाई कुडे विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा |
धरणगाव प्रतिनिधी - शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेचा युगात आपल्या करिअरसाठी जिद्द चिकाटी व मेहनत केल्यास आपण ध्येयप्राप्ती कडे जाऊ शकतो एवढे नव्हे तर आपण जिवनात यशस्वी होऊ शकतो असे भावात्मक प्रतिपादन जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले
नुकत्याच येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे प्राथमिक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्कुटी वाटप कार्यक्रम संपन्न त्या प्रसंगी ना.गुलाबराव पाटील बोलत होते
बालकवी ठोंबरे विद्यालयाचा पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात
असंख्य नागरीक विद्यार्थ्यांसह पालक वर्ग उपस्थित होते
नुकताच दहावी एसएससी बोर्डात तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कुटी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येतो गेल्या तीन वर्षापासून हा बहुमान धरणगाव तालुक्यातील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत आहे मागील वर्षी नंदिनी राकेश पवार हिने 98% मार्क मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याच्या मान मिळवला होता यावर्षी धनश्री अनिल पाटील हिने 95.80% टक्के गुण मिळवून हा बहुमान मिळवला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या स्वखर्चातून एक लाख रुपये किमतीची स्कुटी देण्यात येते यावर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 21 ऑगस्ट रोजी बालकवी ठोंबरे विद्यालय कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष चिंतामण पाटील,सचिव ललित उपासनी,ऑडव्होकेट राजेंद्र येवले,
शोभाताई चौधरी, प्रा हेमंत पाटील सर,ज्ञानेश्वर भामरे, मार्गदर्शक प्रा. आर. एन. महाजन, व जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.सी.आबा पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील,
पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पवार, जळगाव शेतकी संघाचे सदस्य जितेंद्र पाटील, नगरपालिकेचे गटनेते विलास महाजन,उपस्थित होते.
प्रारंभी प्रस्ताविकातुन संसंथेचे उपाध्यक्ष चिंतामण पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली
अध्यक्षिय भाषणात हेमलाल भाटीया यांनी ना पाटील यांनी विद्यालयाचा विविध कामाचे दिलेल्या सहकार्याची प्रशंसा केली
व असेच सहकार्य करीत रहावे असा आशावाद व्यक्त केला
संस्थेचे सर्व संचालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यशस्वी विद्यार्थी यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते स्कुटीची चावी देऊन त्यांच्या व त्यांच्या पालकांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील साहेब यांनी सांगितले जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत असा समाज उपयोगी कार्यक्रम मी करीत राहील आमदार मंत्री असताना रस्ते असतील बंधारे असतील पाणीपुरवठ्याचे कामे असतील सभागृह असतील असे विविध कामे होत असतात ते तर आमचे कर्तव्य आहे परंतु धरणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या शाळेसह मतदारसंघाचे नाव लौकीक करावे हा या मागचा उद्देश बालकवी ठोंबरे विद्यालयाला सतत तीन वर्षापासून तालुक्यामधून प्रथम येण्याच्या बहुमान मिळत आहे याच्या आम्हाला अभिमान आहे याचे सर्व श्रेय त्यांचे गुरुजन आणि पालकांना जाते अनेक वर्षापासून अशा समाजसेवेचे काम आम्ही सतत करीत आलेलो आहोत जळगाव ग्रामीण मतदार संघातील जवळजवळ 17000 रुग्णांना मोतीबिंदू शिबिर घेऊन त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले यावर्षी दोन लाख 50 हजार मोफत वह्या वाटप 5000 ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर दर्शन 3000 विद्यार्थ्यांना सायकली वाटप दिव्यांग बांधवांना दोन हजार बॅटरी वरच्यासायकली वाटप मतदारसंघातील कीर्तनकार बांधवांसाठी कीर्तनाच्या साहित्य वाटप मतदार संघामध्ये ॲम्बुलन्स धरणगाव शहरासाठी लवकरच सर्व सोयीयुक्त अशी ॲम्बुलन्स स्वर्गरत मतदार संघातील 7500 अनाथ मुलांना साहित्य वाटप नियमित जिल्ह्यातील रुग्णांना जे जे हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल या ठिकाणी सर्व मदत त्या ठिकाणी रुग्णाच्या सेवेसाठी दोन कर्मचारी 24 तास उपलब्ध असतात नुकतेच मतदार संघातील 50 कुटुंबांना जगन्नाथ पुरी यात्रेसाठी सहकार्य अशा विविध समाजसेवेचे कार्य मतदारसंघात करीत असतो जोपर्यंत माझे हातपाय चालतील तोपर्यंत राजकारणाबरोबरच समाजसे वासुद्धा मी कायमस्वरूपी करीत राहील भविष्यात ज्या एनजीओ संस्था आहेत शाळा चालतात अशा संस्थांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणे निधीची उपलब्धता करण्यासाठी आम्ही मंत्रालयातून प्रयत्न करीत अहो जिल्ह्याच्या डी पी डी सी मधून अशा संस्थांना सुद्धा वॉल कंपाऊंड असेल शाळा खोल्या असतील त्या देण्याच्या आमच्या संकल्प आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह संस्थेचे आपल्या मतदारसंघाचे नाव जास्तीत जास्त कसे पुढे जाईल यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील, एस एस पाटील,पर्यवेक्षक डी आर चव्हाण शिवसेना-भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी शाळेचे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे एडवोकेट राजेंद्र येवले यांनी केले प्रसंगी शहर परीसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थी विशाल चौधरी याच्या गंभीर आजारासाठी मा गुलाबरावजी पाटील यांनी व जगदंबा कन्स्ट्रक्शन चे विनय भावे(पप्पू भावे),विलास महाजन,वाल्मिक पाटील यांनी भरीव स्वरूपात आर्थिक रक्कम देण्याचे जाहीर केले. नंतर भाऊंच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

Post a Comment