Top News

महात्मा फुले हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रथम क्रमांक - इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, द्वितीय - साळवे इंग्रजी विद्यालय , तृतीय -  नांदेड हायस्कूल, उत्तेजनार्थ बा च भाटिया हायस्कूल व महात्मा फुले हायस्कूल

धरणगाव -  शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव व शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या मार्गदर्शनाने तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६ -२७  अंतर्गत विज्ञान नाट्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आर जी सैंदाणे होते. प्रमुख अतिथी पाळधी बीट चे केंद्रप्रमुख प्रदिप जाधव, विज्ञान मंडळाचे तालुका समन्वयक नवनीत सपकाळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विज्ञान नाट्य स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय , साळवे हायस्कूल , नांदेड हायस्कूल ,महात्मा फुले हायस्कूल , बोरगाव हायस्कूल, बा च भाटीया हायस्कूल साकरे,पिंपरी मुलींची शाळा अशा सात शाळांचा समावेश होता.

           तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, द्वितीय साळवे इंग्रजी विद्यालय , तृतीय नांदेड हायस्कूल ,उत्तेजनार्थ बा च भाटिया हायस्कूल व महात्मा फुले हायस्कूल चा होता. परीक्षक म्हणून  चित्रकला शिक्षक  सुनिल तायडे, समाधान कोळी, श्याम सपकाळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान तालुका समन्वयक नवनीत सपकाळे व विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सैंदाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या विज्ञान नाटिकांचे कौतुक व अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील उपशिक्षक एस एन कोळी व एस व्ही आढावे तर आभार खान सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज