![]() |
| गायत्रीला विद्यालयातील विज्ञान शिक्षिका तथा पर्यवेक्षिका सौ. भारती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. |
धरणगाव : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य आणि आव्हाने” या विषयावर आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. गायत्री लिलाधर माळी हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
ही वक्तृत्व स्पर्धा सा. दा. कुडे माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य, बदलती ऊर्जा गरज, पर्यायी ऊर्जास्रोत तसेच आगामी आव्हाने या विषयांवर गायत्रीने प्रभावीपणे आपले विचार मांडत परीक्षकांची मने जिंकली.
गायत्रीला विद्यालयातील विज्ञान शिक्षिका तथा पर्यवेक्षिका सौ. भारती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील व मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांनी गायत्रीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व विज्ञानविषयक उपक्रमांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Post a Comment