Top News

सुप्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार, अभिनेते तथा समाजसेवक सूरज पवार यांचा वंदना गव्हाणे फिल्म प्रोडक्शनतर्फे सत्कार

प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथील रॉयल हॉटेलमध्ये नुकतेच आगामी 'आधार' या मराठी चित्रपटासाठी कलाकार निवड ऑडिशनचे आयोजन करण्यात आले. ऑडिशनची सुरुवात बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. या ऑडिशनमध्ये राज्यभरातील अनेक नवोदित कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले अभिनय कौशल्य सादर केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संजय हर्षे (ब्रह्मपुरी, चंद्रपूर), अभिनेते व दिग्दर्शक जनार्दन राठोड तसेच चित्रपट निर्माती वंदना गव्हाणे उपस्थित होत्या.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार, समाजसेवक, अभिनेते, 'वसंत गीतांजली' या काव्यसंग्रहाचे संपादक तसेच बंजारा ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाप्रमुख सूरज सुधाकरराव पवार यांची आगामी 'आधार' या मराठी चित्रपटामध्ये पोलीस निरीक्षक (इन्स्पेक्टर) या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल वंदना गव्हाणे फिल्म प्रोडक्शनच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूरज पवार यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्यांच्या साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज